Panchayant Season 4 – रिंकी-सचिवजीचे लग्न होणार का? पंचायतच्या चौथ्या सीजनच्या शुटिंगला सुरुवात

या वर्षी पंचायतचा तिसरा सीजन प्रदर्शित झाला होता. दोन सीजनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर तिसऱ्या सीजनचे प्रेक्षक वाट बघत होते. आता पंचायतच्या चौथ्या सीजनचे शुटिंगही सुरू झाले आहे.

तिसऱ्या सीजनमध्ये एकीकडे फुलेरावासियांची आमदारासोबत शत्रुत्व वाढत होते. तर दुसरीकडे सचिव अभिषेक आणि रिंकीमध्ये जवळीक वाढत होती. पण अखेरपर्यंत दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. आणि शेवटी प्रधानजींना कुणीतरी गोळी मारतं. आता या एवढ्या सस्पेन्सनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कदाचित 2025 किंवा 2026 लाच या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळू शकते. कारम पंचायतच्या चौथ्या सीजनजे चित्रीकरण सुरू झाले आहे. प्राईम व्हिडीओने शुटिंगचे काही फोटो पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. 2020 साली पंचायतचा पहिला सीजन आला होता प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने बाकीचे दोन सीजन आले होते. त्यामुळे चौथा सीजन यायला 2025 किंवा 2026 उजाडू शकतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)