Palghar: भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातवरण

मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा अचानक भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पालघरमधील डहाणू तलासरी भागात रविवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

या घटनेत कोणतीही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही सेकंदासाठी जमीन हादरत होती, त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पळ काढला होता.