मोगरा कोमेजलाSS.. मोगरा कोमेजला, भाव कोसळल्याने पालघरमधील शेतकरी आर्थिक संकटात; प्रतिकिलो बाराशेचा दर तीनशेवर घसरला

अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसला असतानाच आता पालघर जिल्ह्यातील मोगरादेखील ‘कोमेजला’ आहे. येथील दर्जेदार व सुवासिक मोगऱ्याला मुंबई आणि परिसरात मोठी मागणी असते. पण सध्या भाव कोसळल्यामुळे फुल उत्पादक, शेतकरी संकटात सापडला आहे. खते, कीटकनाशके तसेच मजुरीचा खर्च परवडत नसल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. प्रतिकिलो 1 हजार ते 1 हजार 200 रुपये असा मिळणारा भाव आता प्रतिकिलो 300 ते 450 रुपयांवर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.

भाताच्या पिकांवर अवलंबून होता. पण पावसाचा भरवसा नसल्याने अनेक शेतकरी फळभाज्या, पालेभाज्या तसेच फुलशेतीकडे वळले आहेत. डहाणू, विक्रमगड, जव्हार, तलासरी आणि पालघर तालुक्यामध्ये मोगऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यातील 186 हेक्टर क्षेत्रामध्ये मोगरा पिकवला असून उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सध्या होत आहे. एका हेक्टरमागे तीन ते साडेतीन टन मोगऱ्याचे वार्षिक उत्पादन घेण्यात येते. शेतकरी पहाटे उठून मोगऱ्याची फुले मुंबईतील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात.

पूर्वी पालघरमधील मोगऱ्याला एका किलोमागे अंदाजे बाराशे रुपये एवढा दर मिळत होता. आता हा दर साडेचारशेवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता मोगऱ्याचे उत्पादन घ्यायचे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. त्याशिवाय खत व कीटकनाशके आणि औषधांचे दरही आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्याशिवाय मजुरी आणि इंधनाचा खर्चदेखील बेसुमार वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

करीत होतो, पण आता फुलशेती आणि पालेभाज्यांचे उत्पादनही घेतो. त्यामुळे आमचा आर्थिक स्तर वाढला आहे. मात्र आजूबाजूला कृषी खरेदी-विक्री केंद्र नसल्याने आम्हाला फुले विकण्यासाठी दूर जावे लागते. जर आमच्या परिसरात कृषी हब उभारला गेला तर हमीभावाने उत्पादन विकणे शक्य होईल. – नरेश गायकवाड, मोगरा उत्पादक शेतकरी