संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशानंतर एकादशी दिवशी बुधवारी दि. 31 रोजी श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी, वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विणेकरी यांच्या अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या कार्यक्रमाने देवस्थानाच्या वतीने हरिनाम गजरात झाली. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास लाखावर भाविकांनी कामिका आषाढी एकादशी दिनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी परंपरेने देवस्थानातर्फे आणि कुऱ्हाडे पाटील, डॉ. नाईक परिवाराच्या वतीने नारळ व प्रसाद वाटप करून सांगता झाली. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात तसेच हजेरी मारुती मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.
या प्रसंगी आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, पुजारी अमोल गांधी, राजाभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष मानकरी राहूल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरू,स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक यांचेसह दिंडीकरी, विणेकरी मंदिरात उपस्थित होते.
परंपरेच्या उपचारात मंदिरात परंपरेने श्रीना पवमान अभिषेख, दुधारती झाली. श्रीना नैवेद्य झाला. यावर्षी श्रींचे पालखीचे नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मंदिर प्रदक्षिणेत सोहळ्यातील दिंड्यांतील विणेकरी यांचे अभंग झाले. आषाढी एकादशी असल्याने मंदिरात श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि एकादशी निमित्त नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. खऱ्या अर्थाने सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली. टाळ मृदंगाचा निनाद, हरी नामाचा जयघोष करीत श्रींचा चांदीचा लक्षवेधी मुखवटा फुलांनी सजलेल्या पालखीत विराजमान करीत श्रींचे पालखीची आषाढी एकादशी दिनी वैभवी मंदिर व नगरप्रदक्षिणा झाली. माऊलींचे पायी वारी पालखी सोहळा कालावधीत मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. चक्रांकित महाराज परिवार तर्फे हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. यावेळी उपस्थितांना श्रवण सुखाची ज्ञानभक्तीमय पर्वणी लाभली.