Photo – पलक तिवारीने रिक्रिएट केला कतरिनाचा लूक, गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसतेय सुंदर

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीची पॉप्युलॅरिटी बॉलीवूड स्टारपेक्षा काही कमी नाही. तिला इंडस्ट्रीमध्ये बिजली गर्ल या नावाने ओळखले जाते. पलक तिच्या सौंदर्याबरोबरच तिचा फॅशन सेन्सही फार कमालीचा आहे. अनेकदा ती आपल्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधते. सध्या तिने नुकतेच शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

पलकने कतरिना कैफचा एक आयकॉनिक लूक रिक्रिएट करत हॉट फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

पलकचे हे लूक कॅटरिनाच्या चाहत्यांनाच नाही तर फॅशन लव्हर्सनाही इन्स्पायर करत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये पाहू शकता की, अभिनेत्री पलक तिवारी गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर आऊटफीट घातला आहे. ज्यामध्ये ती बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अंदाजात दिसत आहे.

तिने केसांचा बन करुन लाईट मेकअप केला आहे. पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.