
हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारची अक्षरशः झोप उडाली आहे. हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे, पाकिस्तानी सैन्य सज्ज ठेवण्यात आले आहे असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेण्याऐवजी देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास अण्वस्त्रांचा वापर करू, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानात प्रचंड संताप व्यक्त असून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शी चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सिंधु जलकरार रद्द केल्यानंतर शरीफ यांनी पाणी रोखण्याचे प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी दर्पोक्ती केली होती.