पाकिस्तानची पाटी कोरीच

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत यजमान पाकिस्तानी संघाच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. तीन सामने खेळलेला पाकिस्तान शून्य विजय मिळवत स्पर्धेबाहेर फेकला गेलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीत अशी कामगिरी करणारा पाकिस्तान हा पहिलाच दुर्दैवी गतविजेता ठरला आहे. ‘अ’ गटात पाकिस्तानला उद्घाटनाच्या लढतीत न्यूझीलंडने हरविले, तर दुसऱया सामन्यात हिंदुस्थानने त्यांची स्पर्धेतूनच विकेट काढली. अफगाणिस्तानविरुद्धचा अखेरचा गटफेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) तब्बल 180 कोटी रुपये खर्चून स्टेडियम्सचे नूतनीकरण केले. 2017 मध्ये चॅम्पियन्स ठरलेला पाकिस्तानी संघ यंदाची जेतेपदाच्या शर्यतीत होता, मात्र पीसीबीमधील अंतर्गत राजकारण, संघनिवडतील वशिलेबाजी या गोष्टींना जबाबदार धरून पाकिस्तानी संघावर चाहत्यांनी टीकेची झोड उठवली.