आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा तात्काळ रद्द केले आणि पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले. एवढेच नाही तर पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढून त्यांना हिंदुस्थानातून हद्दपार करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना केली आहे. यामुळे हिंदुस्थानात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदू निर्वासितांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना आधी जारी केलेल्या दीर्घकालीन व्हिसावर सरकारच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. मात्र जे पाकिस्तानी हिंदू निर्वासित अल्पकालीन व्हिसावर हिंदुस्थानात आले आहेत त्यांना अशी कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली असून पाकिस्तानसारख्या नरकामध्ये आम्हाला परत पाठवू नका अशी याचना त्यांनी केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

अटारी-वाघा सीमा पार करून पाकिस्तानातील अनेक हिंदू निर्वासित अल्पकालीन व्हिसावर हिंदुस्थानात आले आहेत. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी व्हिसा रद्द करण्यात आल्याने या अल्पकालीन व्हिसावर हिंदुस्थानात आलेल्या हिंदू निर्वासितांनाही देश सोडावा लागू शकतो. यावर बोलताना सिंधमध्ये राहणारे खेतोराम म्हणाले की, ‘सततच्या छळाला कंटाळून पाकिस्तानातील सर्वकाही विकून आम्ही हिंदुस्थानात आलो होतो. पहलगाम येथे हल्ला होण्याच्या काही दिवस आधी मी, माझी पत्नी आणि दोन मुले हिंदुस्थानात आले होते. पण आता पाकिस्तानसारख्या नरकामध्ये परत जाण्याचा विचार अस्वस्थ करतोय. आम्हाला इथे गोळ्या घाला, किमान आमच्या अस्थी हरिद्वार येथे गंगेत तरी विसर्जित होतील. आम्हाला हिंदुस्थानमध्ये मरणे स्वीकार्य असून पाकिस्तानसारख्या नरकात आम्हाला परत पाठवू नका.’

राधा, तिचा पती राजू राम (वय – 30) हे दोघेही त्यांच्या 7 आणि 8 वर्षाच्या दोन्ही मुलींसह फेब्रुवारी 2023 मध्ये दीर्घकालीन व्हिसावर हिंदुस्थानात आले होते. मात्र त्यावेळी त्यांचा मुलगा घनश्याम दोन महिन्यांचा असल्याने त्याला व्हिसा नाकारण्यात आला होता. तसेच राजू रामच्या पालकांचा व्हिसा अर्जही बाद करण्यात आला होता. त्यामुळे नवजात बाळाला आई-वडिलांकडे सोडून हे दाम्पत्य हिंदुस्थानात आले होते.

गुजरातमध्ये सापडले 575 बांगलादेशी, हरयाणात 460 पाकिस्तानींची होणार चौकशी

दोन वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर घनश्याम आणि त्यांचे आजी-आजोबा 6 एप्रिल रोजी अल्पकालीन व्हिसावर हिंदुस्थानात पोहोचले. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी व्हिसा रद्द करणअयात आल्याने घनश्मामसह त्याच्या आजी-आजोबांना पुन्हा पाकिस्तानात परतावे लागणार आहे. त्यामुळे राधाचा आनंद औटघटकेचा ठरला. माध्यमांशी बोलताना तिला रडूही कोसळले.

सिंधू नदी आमचीच! खोऱ्यात एकतर आमचं पाणी वाहेल किंवा त्यांचं रक्त, बिलावल भुट्टोंची हिंदुस्थानला पोकळ धमकी