
अनेक देशांमध्ये पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. अशाच काहींना हाकलण्यात आले आहे. सौदी अरेबिया, यूएई, ओमान आणि अन्य देशांमधून दोन दिवसांत 170 पाकिस्तानींना मायदेशी पाठवण्यात आले. ते कराचीला पोचल्यावर त्यातील 24 जणांना अटक झाली. 94 पाकिस्तानींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली. अमली पदार्थांची विक्री, अवैधरित्या वास्तव्य, भीक मागणे, कामाचा करार तोडून पळून जाणे असे आरोप त्यांच्यावर आहेत.