पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्ताने हिंदुस्थानच्या दिशेने गोळीबार केला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

हिंदुस्थान सैन्याने याबाबत माहिती दिली आहे. आज सकाळी अकरा वाजता पाकिस्तानने हिंदुस्थानच्या दिशेने गोळीबार केला. जम्मू कश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानने गोळीबार केला. हिंदुस्थानने याचा जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबारात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.