
आयपीएलशी स्पर्धा करायला उतरलेली पाकिस्तान सुपर लीग (पीसीएल) आर्थिक डबघाईला आली आहे. पीसीएलचे दहावे पर्व सध्या खेळवले जात आहे आणि त्यांच्यात सहभाग घेणाऱ्या फ्रेंचायझींना काहीच आर्थिक फायदा झालेला नाही. त्या स्टेडियममध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक दिसत असल्याने स्पॉन्सरही एकामागून एक माघार घेत असल्याचे चित्र दिसतेय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) डोकेदुखी वाढतेय.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशीद लतिफने काही दिवसांपूर्वी पीएसएलला आरसा दाखवला होती. ही स्पर्धा म्हणजे ‘देशातील एखादी लहान स्पर्धा’ असल्याचे मत लतिफने व्यक्त केले होते. ‘जिओ पॉडकास्ट’वर बोलताना लतिफने दावा केला होता की, पीएसएल आयपीएलपेक्षा मोठी आहे, हे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण पीएसएल 10 हा आयपीएलच्या तुलनेत फक्त एक छोटी देशांतर्गत लीग आयपीएलने आपला ब्रँड खूप उंचीवर नेला आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगला फारशी कमाई नाही, तरीही ते स्थिर आहे. पीएसएल ही एक केवळ छोटी लीग आहे.