
दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचे नाक दाबायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थान कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11 हजार कोटींची मागणी केली आहे. दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारणीची 9 मे रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीत नाणेनिधीकडून पाकिस्तानला 11 हजार कोटी द्यायचे की नाही त्यावर निर्णय घेतला जाईल.
पाकिस्तानने मागितली चीनकडे मदत
हिंदुस्थानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने चीनकडेही मदत मागितली आहे. पाकिस्तानने चीनकडेही 10 बिलियन युआन ची आर्थिक मदत मागितले आहे.