
हिंदुस्थानी गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले असलेले हिंदुस्थानी नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना न्यायालयीन मदत देण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयामध्ये अपील करण्याच्या अधिकाराचा उल्लेख नव्हता, असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या वकिलांनी म्हटले आहे. जून 2019 मध्ये ंिहदुस्थानच्या बाजूने निकाल देत, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना हिंदुस्थानी दूतावासाशी संपर्क साधण्याचा अधिकार दिला आहे.