तुरुंगात तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपण चर्चा करू, असा सामोपचाराचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी राजकीय प्रतिस्पर्धी इम्रान खान यांच्यासाठी दिला आहे. अनेक खटल्यांमध्ये दोषी ठरलेले पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पार्टीचे संस्थापक 71 वर्षीय इम्रान खान गेल्या ऑगस्टपासून तुरुंगातच आहेत. जर पीटीआय संस्थापकांना तुरुंगात त्रास होत असेल तर मी पुन्हा सांगतो – चला, आपण बसू आणि बोलू, असे शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीत सांगितले. देशाला पुढे नेण्यासाठी एकत्र बसूया. देशाच्या भल्यासाठी बोलूया. पुढे जाण्यासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे ते म्हणाले.