पाकिस्तानमध्ये रेल्वे हायजॅक, बलूच लिबरेशन आर्मीनं ‘जाफर एक्सप्रेस’मधील 120 सैन्य अधिकाऱ्यांना ओलीस ठेवलं

पाकिस्तानमध्ये अख्खी रेल्वेच हायजॅक करण्यात आली आहे. बलूच लिबरेशन आर्मीने पेशावर ते क्वेटा दरम्यान धावणारी जाफर एक्सप्रेस हायजॅक करत 100 हून अधिक प्रवाश्यांना ओलीस ठेवले आहे. बीएलएने रेल्वे रुळ उडवला आणि त्यानंतर रेल्वेचे अपहरण केले.

जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर बलूच लिबरेशन आर्मीने त्यांच्याविरुद्ध कोणतीही सैन्य कारवाई केली तर सर्व प्रवाश्यांना ठार मारू अशी धमकी दिली आहे. या धमकीला न जुमानता पाकिस्तानी सैन्याने कारवाई सुरू केली असून आतापर्यंत बलूच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यात 6 सैनिक ठार झाले आहेत.

बलूच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवलेल्या प्रवाश्यांमध्ये पाकिस्तानी सैनिक, पोलीस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएफ), आयएसआयच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी सुट्टीसाठी पंजाबला निघाले होते. मात्र बलुचिस्तान भागातील मच भागात बलूच लिबरेशन आर्मीने रेल्वे हायजॅक केली.