
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थान सरकारने कठोर भूमिका घेत सिंधु जल करार रद्द केला तसेच उरी धरणातून जादा पाणी सोडून पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक केला आहे. त्यामुळे झेलम नदीला पूर आला असून मुझफ्फराबादमधील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी हिंदुस्थान कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थाच्या संभाव्य हल्ल्याची माहिती सरकारला दिली आहे. आम्ही लष्कराला हाय अलर्टवर ठेवले आहे. जर आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तर आम्ही अण्विक शस्त्राचाही वापर करू, अशी दर्पोक्ती आसिफ यांनी केली,