
शिवसेना भायखळा विधानसभा व कुलस्वामिनी उद्योगी स्त्री एकत्रीकरण व महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी घोडपदेवच्या म्हाडा संकुलातील मैदानामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर… भाग्यलक्ष्मी खेळ खेळूया पैठणीचा आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेच्या उपविभाग संघटक व संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती शिंदे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, उपनेत्या – विभाग संघटक किशोरी पेडणेकर, माहीम विधानसभेचे विभागप्रमुख – आमदार महेश सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर तसेच भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक मंगेश बनसोड, उपविभाग प्रमुख राम सावंत, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, सहसंघटक हेमंत कदम, रवी चव्हाण, माजी नगरसेविका अंजली मोरे, शाखाप्रमुख काका चव्हाण, रमेश रावल, शाखा समन्वयक सुनील हिरवे, स्वप्नील बागवे, रमेश चेंदवणकर, इमरान खान, युवासेनेचे मुंबई समन्वयक सिद्धेश मंडलिक, चेतन थोरात, विभाग युवा अधिकारी ओंकार पाटील, युवती विभाग अधिकारी विभा मोरे आदी उपस्थित होत्या.
बक्षिसांची लयलूट
या कार्यक्रमात विभागातील सुमारे 1200 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वेगवेगळे खेळ खेळून बक्षिसे मिळविली. प्रथम क्रमांकाला सोन्याची नथ, द्वितीय क्रमांकाला सेमी पैठणी व तृतीय क्रमांकाला चांदीची फ्रेम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. या कार्यक्रमात लकी ड्रॉ कुपनमार्फत 100 महिलांना विविध प्रकारांची बक्षिसे देण्यात आली.