भुमरेंच्या घराणेशाहीला पैठणची जनता वैतागली : दत्ता गोर्डे

‘पैठण तालुक्यातील जनता भुमरेंच्या घराणेशाहीला वैतागली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात आहे. या दहशतीला न जुमानता लोकांनी निर्भयपणे मशाल चिन्हाचे बटण दाबून शिवसेनेला मतदान करावे,’ असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी आज केले. पैठण विधानसभा मतदारसंघातील 14 छोटी गावे, वाड्या, तांडे व शेतवस्त्यांवर आज प्रचाराच्या कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. वडाचा तांडा, एकतुनी, थापटी तांडा, गाव तांडा, देवगाव, देवगाव तांडा, रजापूर, घारेगाव, घारेगाव पिंपरी, तुपेवाडी या गावातील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले.

काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कांचनकुमार चाटे म्हणाले की, ‘संदिपान भुमरे यांनी त्यांच्या सत्ताकाळात पैठण तालुक्याचे वाटोळे केले. आलेल्या निधीचा गैरवापर केला. स्वतःचा विकास साधत 10 पिढ्यांची सोय करून ठेवली. यापुढे ही चूक करु नका. महाविकास आघाडीचे निडर व विकासाची दृष्टी लाभलेले उमेदवार दत्ता गोर्डे यांनाच मतदान करा. यासाठी व्होटिंग मशिन वरील पहिल्या क्रमांकाचे मशाल चिन्हाचे बटण दाबून मतदान करा’, असे आवाहन त्यांनी केले. या कॉर्नर बैठकांमध्ये जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, विधानसभा संघटक अ‍ॅड. बद्रीनारायण भुमरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे रावसाहेब आडसूळ यांनी घणाघाती भाषणे करून केवळ मशाल चिन्हाचे बटण दाबून परिवर्तन करण्याचे आवाहन केले.

या प्रचार दौऱ्यात संत एकनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद औटे, रावसाहेब आडसूळ, शुभम पिवळ, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल प्रचाराच्या नियोजनासाठी आज आढावा बैठक महाविकास आघाडी शिवसेना उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बुधवारी ‘आढावा बैठक’ आयोजित करण्यात आली आहे. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या मुख्य उपस्थितीत चित्ते पिंपळगाव येथे होणाऱ्या या बैठकीस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिद्धेश्वर मंगल कार्यालयात सकाळी 9 वाजता होणाऱ्या या बैठकीस पांडुरंग तांगडे, जिल्हाप्रमुख राजू राठोड, संतोष शेजूळ, राजेंद्र साळुंके व आनंद भालेकर हे उपस्थित राहणार आहेत.

घोडके, आतिष गायकवाड, बद्रीनारायण भुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश दुबाले, डॉ. कांचनकुमार चाटे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक निवृत्ती बोबडे व रामेश्वर थोरे उपस्थित होते.