आधी मतांसाठी पैसे दिले, सत्ता आल्यानंतर वसुलीसाठी लावले निकष; ‘लाडकी बहीण’ बाबत केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा

महायुती सरकारने (Mahayuti Government) राज्यातील विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी घाईगडबडीत लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आणली. त्यावेळी कोणतेही निकष किंवा पात्र, अपात्र अशी कोणतीही खातरजमा न करता मतांसाठी राज्यातील महिलांना या योजेनचा लाभ देण्यात आला. मात्र निवडून आल्यानंतर आता निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना मिळालेले पैसे परत करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. यावरूनच आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर टीका केली आहे.

दिल्लीत एका आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ”महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतून ज्यांना यांनी (भाजप) पैसे दिले, त्यांना आता पैसे वसूल करण्यासाठी ते शोधत आहेत. आपल्या देशात असं कधी झालं होतं का की, जनतेला सरकारी योजनेतून कोणती सुविधा दिली आणि आता ते म्हणत आहेत की, पैसे परत करा. यापेक्षा निर्लज्जपणा काय असू शकतो?”

केंद्र सरकारनं मित्रांचं 10 लाख कोटींचं कर्ज माफ केलं – अरविंद केजरीवाल