सवलतीच्या दरात ‘12 महिने, 12 नाटकं’ बघा!

नाटय़प्रेमी परिवाराच्या ‘12 महिने, 12 नाटकं’ या योजनेच्या माध्यमातून वर्षभर सवलतीच्या दरात प्रत्येक महिन्याला एक नाटक पाहता येते. योजनेची 2025 – 2026 या वर्षाची सशुल्क सवलत सभासद नोंदणी सुरू झाली आहे. नाटय़प्रेमी परिवार संस्थेची ही योजना केवळ माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात  सोमवार ते शनिवारी होणाऱ्या प्रयोगांसाठी आहे. ही संधी रसिकांनी सोडू नये, असे आवाहन नाटय़प्रेमी परिवारने केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 9769977380

n  समीर बापर्डेकर या ध्येयवेडय़ा नाटय़प्रेमीने ही आगळीवेगळी योजना सुरू केली. गेली 19 वर्षे वर्षभर सवलतीच्या दरात यशस्वीरीत्या सुरू आहे. दर्जेदार नाटकांची निवड आणि अत्यंत काटेकोर व शिस्तबद्ध नियोजन हे या यशाचे फलित आहे.