Pahalgam Terrorist Attack – मला मुसलमान असल्याची लाज वाटतीये, प्रसिद्ध गायकाने व्यक्त केला संताप

मंगळवारी (22 एप्रिल 2025) जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सारा देश या हल्ल्यामुळे हादरून गेला आहे. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेद केला जात आहे. प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट याने सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त करत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून मला मुसलमान असल्याची लाज वाटतीये असं तो म्हणाला आहे.

सलीम मर्चंटने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, हिंदू नसून मुसलमान असल्यामुळे पहलगाममध्ये निर्दोष नागरिकांची हत्या झाली. हे हल्लेखोर मुसलमान आहेत? नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम या गोष्टी शिकवत नाही. कुरान-ए-शरीफ मध्ये सूरा अल-बकराच्या 256 व्या आयतमध्ये म्हटलं आहे की, धर्माच्या बाबतीत कोणतीही सक्ती करायची नाही, अस म्हणत सलीमने आपल्या राग व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salim Merchant (@salimmerchant)

मला मुस्लीम असल्याची लाज वाटतीये की, मला हा दिवस बघावा लागतोय. माझ्या निष्पाप हिंदू बांधवांना इतक्या क्रुरपने मारण्यात आलं. कशासाठी तर ते हिंदू आहेत म्हणून. काश्मीरमध्ये राहणारे जे लोक गेल्या तीन वर्षांपासून चांगले जीवन जगत होते, त्यांना पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागणार आहे. माझे दुःख आणि राग कसा व्यक्त करावा हे मला समजत नाही, अस तो म्हणाला आहे.

Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत