Pahalgam Terrorist Attack – हल्लेखोरच नाही तर, पडद्यामागे कट कारस्थान रचणाऱ्यांपर्यंत पोहोचू; संरक्षणमंत्र्यांचा गर्भीत इशारा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गर्भीत इशारा दिला आहे. पहलगाममध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले आहे. यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. सरकार आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल, याची मी देशवासीयांना खात्री देतो. आम्ही केवळ या कृत्याचे कटकारस्थान रचणारे आणि पडद्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचू, असे राजनाथ सिंह म्हणाले.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिक गमावले आहेत. या अमानवी कृत्यामुळे आपण सर्वजण खूप दुःखात आहोत आणि वेदनेत आहोत. सर्वप्रथम ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, अशा सर्व कुटुंबांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखद प्रसंगी मी परमेश्वराकडे दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Pahalgam Terror Attack- युरोप व्हिसा न मिळाल्याने कश्मीरला हनिमूनसाठी गेले, नौदल अधिकाऱ्याला तिथेच मृत्युने गाठले! 

दहशतवादाविरुद्ध आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे. या भ्याड कृत्याविरुद्ध हिंदुस्थानमधील प्रत्येक नागरिक एकजूट आहे. हिंदुस्थान घाबरणारा नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकार आवश्यक आणि योग्य ती सर्व पावलं उचलेल, असे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिले. फक्त हल्लेखोरच नाही तर, पडद्यामागे कट कारस्थान रचणाऱ्यांपर्यंत पोहोचू, असा गर्भीत इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.

Pahalgam Terror Attack- आई मी कश्मीरवरुन आल्यावर तुला भेटायला येईन, नीरजचं ते अखेरचं बोलणं ठरलं…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत सीडीएस जनरल अनिल चौहान, तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि सैन्य मोहीमांचे महासंचालक उपस्थित होते. या बैठकीत दहशतवादी मोहीमांमध्ये गती आणण्याचे निर्देश संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी दिले.