
पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यूतांडव घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात संताप व्यक्त करत अहिल्यानगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी ‘मुर्दाबाद… मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद…’ अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्ली गेट परिसर दणाणून सोडला. यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, हा हल्ला पाकिस्तानचेच षडयंत्र आहे. याला केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी, अशी मागणी शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्रा. अंबादास शिंदेसर, विलास उबाळे, जेम्स आल्हाट, दीपक भोसले, किरण बोरुडे, सुनील त्रिपाठी, पप्पू ठुबे, प्रशांत पाटील, सुनील भोसले, सचिन शेंडगे, राष्ट्रवादीचे अनिकेत कराळे, काँग्रेसच्या उषा भगत, अनिस चुडीवाला, गौरव ढोणे, युवासेनेचे आनंद राठोड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, अशोक जावळे, आनंद जवंजाळ, केशव दरेकर, गणेश आपरे, महावीर मुथा, अमित शिंदे, विनोद दिवटे, अमोल सानप, रमेश आव्हाड, जयराम आखाडे, नितीन जगधने, महावीर मुथा, महादेव बुरा, दीपक गांगुर्डे, प्रकाश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.