जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना आम्ही विमानात बसवून आणलं! बेताल आणि असंवेदनशील

पहलगाम हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत बोलताना ‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून परत आणलं,’ असे बेताल आणि असंवेदनशील वक्तव्य मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले. ‘हे गरीब लोक, त्यांच्या खाण्याचे वांदे होते, 45 लोकं रेल्वेने कश्मीरला गेले होते, ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे आज पहिल्यांदा विमानात बसले, असेही म्हस्के म्हणाले.