
जम्मू-कश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या अतुल मोने, हेमंत जोशी, सचिन लेले यांचे मृतदेह आज डोंबिवलीत आणण्यात आले. त्यांना अग्निडाग देताच डोंबिवलीकरांच्या दुःखाचा बांध फुटला. ‘मोदी सरकार जवाब दो’च्या घोषणांनी डोंबिवलीकरांनी आक्रोशाला मोकळी वाट करून दिली. एका महिलेने तर हुंदके देत देशाचे मुख्य म्हणवणारे कुठे होते? असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईव्हीएमचा घोटाळा करून सत्तेवर आलेल्या सरकारला सर्वसामान्यांच्या जिवाचे मोल आहे काय, असे खडे बोलही सुनावल़े