सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हल्ल्याबाबत आणि सुरक्षेबाबत माहिती देतील असे सूत्रांनी सांगितले.