पाकिस्तान को जला दो… शोकाकुल पुणेकरांचा संताप; संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वंदे मातरम … भारत माता की जय… गर्व से कहो हम हिंदू हैं… पाकिस्तान को जला दो… अशा घोषणा देत शोकाकुल नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संताप व्यक्त केला.

त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. काwस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्यावर आज भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने वैपुंठ स्मशानभूमित गर्दी केली होती. हल्ला झाला त्यावेळी अंगावर जे कपडे होते, त्या कपडय़ावर रक्ताचे शिंतोडे पडले होते. रक्ताचे शिंतोडे असलेल्या त्याच कपडय़ांवर आसावरीने वडील संतोष जगदाळे यांना अग्नी दिला.

बीटिंग रिट्रीटसाठी दरवाजे बंद

बीटिंग रिट्रीटसाठी आज दोन्ही देशांचे गेट उघडले गेले नाहीत. गेट बंद असतानाच दोन्ही देशांचे ध्वज उतरवण्यात आले. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी रेंजर्ससोबत हस्तांदोलनही केले नाही. यावेळी उपस्थित नागरिकांची संख्याही कमी होती. रोज येथे जवळपास 20 हजार नागरिक उपस्थित असतात. परंतु, आज 10 हजार नागरिकच उपस्थित होते.

पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने

नवी दिल्ली येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर सुमारे 500 जणांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त केला. हातात फलक घेऊन आणि पाकिस्तानविरुद्ध घोषणा देत निदर्शकांनी पाकिस्तानवर हिंदुस्थानातील दहशतवादी कारवाईला पाठिंबा देत असल्याबद्दल कारवाईची मागणी केली. भाजप, दहशतवादविरोधी कृती मंच यात सहभागी झाले. दिल्ली पोलिसांनी दूतावाबाहेर सुमारे 500 मीटर अंतरावर लावलेल्या बॅरिकेड्सजवळच निदर्शकांना तिथेच थांबवण्यात आले.

नौदलाकडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नौदलाच्या आयएनएस सुरत या युद्धनौकेवरून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मध्यम पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राची हल्ला करण्याची क्षमता सुमारे 70 किमी आहे.  तसेच हवाई दलाने युद्धाभ्यास सुरू केले असून याला आक्रमण असे नाव दिले आहे.