Pahalgam Terror Attack – पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले, अतुल मोने अशी मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची नावं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या पुण्यातील पर्यटकांना देखील गोळी लागल्याचे समजते.

पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे हे पर्यटक पहलगाम फिरायला गेले होते. या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे हे जखमी झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)