जखमींचा मुंबईत येण्यास नकार, जिवाला धोका नको म्हणून कश्मीरमध्येच उपचार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींवर सध्या जम्मू-कश्मीरमधील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मुंबईतील लीलावती, रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयांनी जखमींवर मोफत उपचार करण्याची तयारी दाखवली. परंतु विमानाद्वारे मुंबईत येऊन उपचार करण्यात बराच वेळ खर्ची पडू शकतो. गंभीर जखमी रुग्णांमध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जखमींनी मुंबईतील रुग्णालयांमध्ये दाखल होण्यास नकार दिल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लीलावती आणि रिलायन्स फाउंडेशनने जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. परंतु त्यांनी विमानाद्वारे येण्यात बराच वेळ खर्च होईल. उलट जम्मू-कश्मीरमध्ये उत्तम उपचार केले जात आहेत. हवामानाच्या दृष्टीने तेथील वातावरणही उत्तम आहे. त्यामुळे तेथेच उपचार करून घेण्यास जखमींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सहमती दर्शवली, अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या मार्केटिंग विभागातील उल्हास पाटील यांनी दिली.