Pahalgam Attack – पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन, पाकिस्तान सैन्यानेही केली होती मदत

Photo of terrorists who killed 26 Pahalgam tourists released

पहलगाम हल्ल्याची प्लॅनिंग लश्कर ए तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरीने केली होती. तसेच याबाबत फेब्रुवारीत बैठक घेतली होती. सैफुल्लाहने या हल्ल्यासाठी पाच दहशतवाद्यांना तयार केलेहोते. त्यानंतर या पाचही दशहतवाद्यांची मार्चमध्ये पुन्हा बैठक झाली होती. जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध असल्याचा समोर आले आहे.

ABP न्युजने याबाबती वृत्त दिले आहे. पहलगाम हल्ल्याचे नियोजन फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. लश्करचा नेता सैफुल्लाहच्या आदेशानंतर हे नियोजन सुरू झाले. फेब्रुवारीत या दहशतवाद्यांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर मीरपूर भागात या दहशतवाद्यांची दुसरी बैठक पार पडली. याच बैठकीत पहलगाममध्ये हल्ला करण्याचे ठरले होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याची मदत मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच जम्मू कश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी सैफुल्लाहला आयएसायकडून आदेश मिळाले होते.

सैफुल्लाहने मार्च महिन्यात जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर भागातील मुख्यालयाला भेट दिली होती. या ठिकाणी एक कार्यक्रम झाला होता, या कार्यक्मात कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला गेला.