
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुखावला गेला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. पण असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे देशाच्या जनतेला हवी आहेत. कश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत असतानाही सुरक्षेत अशी चूक का झाली? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप आणि आक्रोश आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर हिदुस्थानने पाकिस्तान विरुद्ध कारवाई करत अनेक ठोस पावलं उचलली आहेत. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचे सांगितले. आता काँग्रेसने या हल्ल्याबाबत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
पहलगाम आतंकी हमला कई सवाल खड़े करता है 👇🏼
• सुरक्षा में चूक कैसे हुई?
• इंटेलिजेंस फेल कैसे हुआ?
• आतंकी बॉर्डर के अंदर कैसे आए?
• 28 लोगों की मौत का जिम्मेदार कौन?
• क्या गृह मंत्री अपने पद से इस्तीफा देंगे?
• क्या PM मोदी इस चूक की जिम्मेदारी लेंगे? pic.twitter.com/WqVKff6vHe— Congress (@INCIndia) April 25, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. पण असे काही प्रश्नं आहेत ज्यांची उत्तरे देशातील जनतेला हवी आहेत. काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत असतानाही सुरक्षेत अशी चूक का झाली? लष्कर आणि सीमा थेट मोदी सरकारच्या अखत्यारीत येतात, तरीही दहशतवादी सीमावर्ती भागात इतक्या आत कसे घुसले? इन्टेलिजन्सने एवढी मोठी चूक कशी केली? अशी प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसने विचारले हे 6 प्रश्न…
1. सुरक्षेत चूक कशी झाली?
2. गुप्तचर यंत्रणा कशी अपयशी ठरली?
3. दहशतवादी सीमेवरून कसे घुसले?
4. 26 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे?
5. गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का?
6. या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेणार का?