>> वर्षा चोपडे
हिंदुस्थानात भगवान विष्णूची अनेक प्रसिद्ध 108 मंदिरे आहेत. त्यापैकी केरळचे तिरुवनंतपुरम पद्मनाभस्वामी मंदिर एक आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे तिथल्या प्राचीन खजिना आणि त्यातील मोजदाद करण्यास अवघड इतकी संपत्ती. हिरे, विष्णूची सोन्याची मूर्ती, रत्नजडित सिंहासन, मुकुट, सोन्याची नाणी, मौल्यवान रत्ने, असंख्य मौल्यवान दागदागिने अशा अकल्पनीय संपत्ती असलेले हे मंदिर यामुळे जास्त लक्षवेधी ठरते.
रळला देवभूमी म्हणतात अशा या केरळात अगणिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची रचना जवळजवळ सारखी असली तरी प्रत्येक मंदिराची कथा वेगळी आणि वैशिष्टय़ही निराळे आहे. भगवान विष्णूची रूपे अनेक आहेत. त्यापैकी पंढरपूरचे विठ्ठल-रुख्मिणी मंदिर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मुख्य स्थान आहे.
हिंदुस्थानात भगवान विष्णूची अनेक प्रसिद्ध 108 मंदिरे आहेत. त्यापैकी केरळचे तिरुवनंतपुरम पद्मनाभस्वामी मंदिर एक आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे तिथला प्राचीन खजिना आणि मोजदाद करण्यास अवघड इतकी संपत्ती. इतिहासकारांच्या मते, मंदिर आठव्या शतकातील आहे. परंतु या मंदिराची पुनर्रचना 18 व्या शतकात तत्कालीन त्रावणकोर महाराजा मार्तंड वर्मा यांनी केली. मंदिर सुरुवातीला लाकडाचे होते, पण नंतर ते ग्रॅनाईटने बांधले गेले. हे मंदिर अनोख्या चेरा वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि त्याची मुख्य देवता भगवान विष्णू आहेत जे अनंत शायन मुद्रामध्ये (पद्मनाभस्वामी शाश्वत योगाची आसनस्थ मुद्रा) आदिशेष किंवा सर्पांचा राजा म्हणून ओळखले जातात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तिरुअनंतपुरम (केरळ) येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील देवतेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवला आहे.
मंदिराशेजारी मोठमोठी जलकुंडं आहेत. त्यात स्नान करून पांढरे वस्त्र घालून भगवान पद्मनाभस्वामी यांचे दर्शन घेण्यात येते. पद्मनाभस्वामीची काळ्या पाषाणात भली मोठी प्रतिमा आहे. गाभाऱयात अंधार असतो केवळ दिव्याच्या प्रकाशात मूर्तीचे तेजस्वी रूप बघता येते. मंदिरात मोफत रुचकर जेवणही मिळते. बाजूलाच असलेला अप्रतिम राजवाडा बघताना भान हरपून जाईल. काही वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करत हे मंदिर चर्चेचा विषय ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे, की मंदिराच्या व्यवस्थापनाचा अधिकार हा प्रथेप्रमाणे राजघराण्याकडेच कायम राहील. मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मंदिरात किमान सहा तिजोऱ्या आहेत. ज्या भूगर्भात, मंदिराच्या गर्भगृहाच्या पश्चिमेला व सभोवताली वसलेल्या आहेत. दस्तऐवजीकरणाच्या उद्देशाने, या तिजोऱ्यांना व्हॉल्ट A, B, C, D, E आणि F म्हणून नावे दिली गेली आहेत. त्यानंतर, दोन अतिरिक्त भूमिगत व्हॉल्ट शोधण्यात आली आहेत आणि त्यांना व्हॉल्ट G आणि व्हॉल्ट H म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष आदेशाशिवाय हे व्हॉल्ट उघडता येणार नाही, असे केरळ सरकारनं सांगितले होते. C, D, E आणि F या चारही तिजोऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या ताब्यात आहेत.
चार फूट (1.2 मीटर) उंच आणि 3 फूट (0.91 मीटर) रुंद, हिरे आणि इतर पूर्णपणे मौल्यवान दगडांनी जडलेली महाविष्णूची सोनेरी मूर्ती आहे. शेकडो हिरे आणि मौल्यवान दगडांनी जडलेले रत्जडीत सोनेरी सिंहासन, सुमारे 30 किलोग्रॅम वजनाचा देवतेला सजवण्यासाठी पोशाख अत्यंत कलाकुसरीने बनवला आहे. माणिक आणि पाचूंनी जडलेले सोन्याचे नारळ, 18 व्या शतकातील अनेक नेपोलियनकालीन नाणी, रोमन साम्राज्याची लाखो सोन्याची नाणी तसेच अनेक मौल्यवान पाचू, रत्ने, हिरे, माणके पोत्यांनी भरलेले असल्याचा दावा केला आहे. असंख्य मौल्यवान दागदागिन्यांमुळे या मंदिराला जगातील सगळ्यात श्रीमंत देवस्थानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. चेरा, पांडय़ा, त्रावणकोर राजघराणे, कोलाथिरी, पल्लव यांसारख्या विविध राजवटींनी देवतेला दान केलेले आणि नंतर मंदिरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू हजारो वर्षांपासून मंदिरात जमा केल्या गेल्या आहेत. या संपत्तीमुळे मंदिराला ‘सुवर्ण मंदिर’ म्हणून संबोधले गेले होते. त्रावणकोरचे राजे मार्तंड वर्मा यांचे वंशजच गेली अनेक शतकं या प्राचीन मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
अब्जावधीचा खजिना आणि त्यासाठी सरू असलेले शीतयुद्ध जगापासून लपले नाही. देवस्थानातील दागिने खजिन्याबाहेर आले तर सुरक्षित राहतील का? ही चिंतेची बाब आहे. सरकारचे देशातील रोजगार, गरिबी, भ्रष्टचार, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक इतर समस्या सोडून खजिन्याच्या मागे लागण्याचे कारण काय? ती देशाची प्राचीन संपत्ती आहे. तिच्याशी उगाच छेडछाड का? इंग्रज देशातील मौल्यवान संपत्ती घेऊन गेले त्यापासून काही बोध घ्यायला हवा. केरळला गेलात तर सहस्रावधीच्या देणग्यांशी संबंधित असलेले हे मंदिर नक्की बघा.
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत)