‘सह्याद्री’च्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा

संपूर्ण सातारा जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘सह्याद्री’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्ये ‘पी. डी. पाटील पॅनेल’ने सर्व 21 जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सभासदांनी मतरूपाने ‘सह्याद्री’चे विद्यमान अध्यक्ष-माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच चुरशीची निवडणूक होईल असे वातावरण होते. दरम्यान, भाजपचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्यामध्ये मतभेदाची दरी पडल्याने विरोधकांमध्येच दोन पॅनेल झाले होते.