अर्थशास्त्र शिकणाऱ्या पहिल्या वर्षातल्या विद्यार्थ्यांना विचारा, पी चिदंबरम यांचा पंतप्रधान मोदींना टोला

भाजप सरकारच्या काळात तमिळनाडूला सर्वाधिक निधी दिला गेला असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पण दावा खोटा आहे, अगदी अर्थशास्त्र शिकणाकऱ्या पहिल्या वर्गातला विद्यार्थीही सांगेल अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी केली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत बजेट वाढतो, तुम्ही गेल्या वर्षाच्या तुलने एक वर्षांनी मोठे आहात असेही पी चिंदबरम म्हणाले

पी. चिदंबरम यांनी एक्सवर पोस्ट करून म्हणाले की पंतप्रधान यांनी दावा केला की रेल्वे प्रकल्पांसाठी युपीए सरकारपेक्षा भाजप सरकारने तमिळनाडूसाठी सातपट पैसे दिले. पण तुम्ही अर्थशास्त्र शिकणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला विचारले की ते सांगितली गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक मापदंड हे नेहमी जास्त असतात. हिंदुस्थानचा जीडीपी वाढला आहे, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत वाढला आहे. केंद्र सरकारचा खर्चही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढला आहे. तुम्ही सुद्धा गेल्या एक वर्षाच्या तुलनेत एक वर्ष मोठे आहात. पण मूळ प्रश्न असा आहे की जीडीपीच्या तुलनेत निधी वाढला आहे का? एकूण खर्चाच्या तुलनेत निधी वाढला आहे का असा सवाल चिदंबरम यांनी विचारला आहे.