प्रवासात किंवा पर्यटनावेळी एक दोन दिवस राहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तीक कारणासाठी लोक ओयो हॉटेल्सला प्राधान्य देतात. इतर मोठया हॉटेल्सपेक्षा लोकांना हे ओयो हॉटेल्स खिशाला परवडणारे आहे. आता या हॉटेल्सने वर्षाच्या सुरुवातीलाच नवी नियमावली जारी केली आहे. Oyo ने त्यांच्याशी जोडलेल्या हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी सुरू केली आहे. यातील काही नियमांमुळे अनेकांची अडचण होणार आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या खोल्यांमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने याची सुरुवात मेरठपासून केली आहे. त्यामुळे जे कपल एकांतात वेळ घालवण्यासाठी oyo हॉटेल्समध्ये येतात त्यांच्यासाठी या हॉटेल्सचे दरवाजे बंद झाले आहेत. आतापासून Oyo मध्ये चेक इन करताना आवश्यक कादपत्रे दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन बुकिंग करताना देखील आपली ओळखपत्रे सादर करणे गरजेचे आहे. तसेच य़ा निर्णयाला लोकांकडून मिळाणाऱ्या प्रतिसादानंतरच इतर शहरांमध्ये हा नियम लागू केला जाईल असे कंपनीने म्हंटले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून काही शहरातील रहिवाशांनी अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. यापार्श्वभूमीवर ओयोने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.