
ओटीटी जगतामध्ये सर्वाधिक पसंती मिळालेली सीरिज म्हणजेच पंचायत. पंचायतचे पहिले तीनही सीझन गाजलेच नाही तर, या प्रत्येक सीझनमधील पात्रंही तितकीच गाजलेली आहेत. पंचायता पहिला सीझन पाच वर्षांपूर्वी आलेला होता. तरीही आजही या सीझनची लोकप्रियता कुठेही कमी झालेली नाही. पंचायत सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली याला अनेक कारणे आहेत. यातील मुख्य कारण म्हणजे पात्रांची निवड. गावातले गावकरी आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गुजगोष्टी प्रेक्षकांच्या मनपसंतीस खूपच उतरल्या. पंचायत मधील प्रत्येक फ्रेम म्हणूनच लक्षात राहिली आहेत.
सध्या ओटीटीवर अनेक सीरिजची चलती आहे. असं असलं तरीही पाच वर्षांनी पंचायतची क्रेझ काहीच कमी झालेली नाही. पंचायतच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. प्राइम व्हिडीओने नुकतीच पंचायत सीझन 4 ची घोषणा केलेली आहे. याकरता प्राइम व्हिडीओकडून एक आनंदाची बातमी पंचायतच्या चाहत्यांसाठी मिळालेली आहे. येत्या 2 जुलैला पंचायत पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये भरणार आहे.
2020 मध्ये सुरू झालेल्या पंचायत या मालिकेला 5 वर्षे पूर्ण होतील. यानिमित्तानेच यंदा येत्या जुलैला चौथा सीझन येतोय. हा सीझनही प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल यात काहीच दुमत नाही. फुलेरा गावातील गावकऱ्यांना आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने, प्रेक्षकही खुश झाले आहेत. सीझन 4 मध्ये अभिषेक, प्रधानजी आणि फुलेरा गावकऱ्यांचा मजेदार प्रवास पाहायला मिळणार आहे.