राज्यात 25 वर्षांनी होणार शिक्षकेतर कर्मचारी भरती

 

राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्षे बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या सुधारित आकृतीबंधानुसार कनिष्ठ, वरिष्ठ, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यकांची नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. अनुपंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशाने ही पदे भरली जातील.

शिक्षकांनाही दिलासा

शिक्षकेतर पदांची भरती बंद असल्याने पंत्राटी तत्त्वावर ही भरती शाळांना करावी लागत होती. त्यांच्या वेतनाचा खर्च भागविताना शाळांची दमछाक होत होती. तर काही शाळांमध्ये शिक्षकांकडूनच शिक्षणेतर कामे करवून घेतली जात होती. त्यांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी दिली.