
ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय माडये यांनी रायगड मिलिटरी स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनात विद्यार्थी आणि पालकांना प्रत्यक्ष सायबर गुन्हे कसे घडतात आणि आपण ते कसे रोखू शकतो तसेच महिला व बाललैंगिक अत्याचाराला प्रतिबंध कशा प्रकारे घालू शकतो याविषयी जनजागृती केली.
ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय माडये यांनी नुकतेच पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या अन्य अधिकाऱ्यांच्या साथीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील एका गुह्यात चोरलेले 3 लाख 15 हजार रुपये किमतीचे 59 मोबाईल हस्तगत करून मिळवलेले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी ओरिएंटल कॉलेज, एच.के. कॉलेज ऑफ फार्मसी, सिटी इंटरनॅशनल स्कूल तसेच रामजन्म कथा महोत्सव या व अशा ठिकाणीसुद्धा नागरिकांना अशाच पद्धतीचे योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे गुह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होत असून नागरिक आरोपीविरोधात तक्रार करायला पुढे येत आहेत. अशी माहिती पोलीस अधिकारी विजय माडये यांनी दिली.