मुंबई शहर जिल्हा योगासन क्रीडा संघटनेच्या (एमसीडीवायएसए) वतीने येत्या 28 जुलैला मुंबई शहर योगासन जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केले जाणार आहे. माटुंगा पूर्वेला शिशुवन शाळा, ब्राह्मणवाडा येथे चाचणी पार पडणार आहे.
या स्पर्धेत 10 वर्षापासून 55 वर्षांपर्यंत असे विविध सहा वयोगट खेळविले जाणार आहेत. त्यामुळे या निवड चाचणी स्पर्धेत मुले-मुली आणि पुरुष-महिला असे सारेच दिसतील. ही स्पर्धा पारंपरिक योगासन, आर्टिस्टिक योगासन (एकेरी आणि जोडी), रिदमीक योगासन (जोडी) अशा प्रकारात खेळविली जाईल. प्रत्येक वयोगटात अव्वल तीन स्पर्धकांची निवड केली जाणार असून ते 15 ते 18 ऑगस्टदरम्यान संगमनेर येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई शहरचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हर्ष छेडा (9702735688), रुद्र दातखिळे (9321583365) आणि काजल काळे (9323911687) यांच्याशी संपर्क साधण्याचे संघटनेचे सचिव महेश कुंभार यांनी आवाहन केले आहे.