
ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी शिथिल होणार आहेत. या अटींसंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या सूचना मागवून योजनेतील सुधारणांबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्राr जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत अनुभवाची अट 30 वर्षे वरून 25 वर्षे तसेच वयाची अट 60 वर्षे वरून 58 वर्षे करण्यात यावी. तसेच सन्मान योजनेतील मानधनाची रक्कम वाढवण्यात यावी अशी मागणी मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघाने यावेळी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, माहिती व जनसंपर्प महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, अधिस्वीपृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे आदी उपस्थित होते.