
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विविध पदासांठी अर्ज मागवले आहेत. वाहन मेकॅनिक, जनरेटर मेकॅनिक, कुक आणि इतर अनेक पदांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्रात 6 ते 18 महिने काम करावे लागेल. भरतीची संपूर्ण माहिती ncpor.res.in वर जारी केलेल्या अधिसूचनेत उपलब्ध आहे. पहिल्यांदाच करारावर अंटार्क्टिकाला जाणाऱ्या उमेदवारांना जहाजावर आणि अंटार्क्टिकामध्ये मोफत बोर्डिंग आणि लॉजिंगची सुविधा मिळेल तसेच ड्रेस मिळेल.