ओपनएआयचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी ‘ओपनएआय’ आता नवे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकासित करत आहे. त्यामुळे इलॉन मस्कच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि मार्क झुकेरबर्गच्या मेटाला चांगली टक्कर मिळणार आहे. विशेष म्हणजे एक्स आणि मेटाने अलीकडेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एआय वैशिष्ट्ये जोडली आहेत. द व्हर्जच्या अहवालानुसार, ओपनएआय आता एक्ससारखे सोशल नेटवर्क तयार करण्याची योजना आखत आहे. या प्लॅटफॉर्मचा प्रोटोटाईप आधीच तयार झाला आहे.