OpenAI च्या संस्थापकावर बहिणीने केले अत्याचाराचे आरोप; म्हणाली 8 वर्षे…

ChatGPT OpenAI चे संस्थापक सॅम ऑल्टमन एआय तंत्रज्ञानात मोठी सुधारणा केली आहे. त्यामुळे जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. पण आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सॅम ऑल्टमन यांची बहीण ॲनी ऑल्टमनने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ॲनी यांनी सॅम विरोधात लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तब्बल 8 वर्षे सॅम यांनी बहीण ॲनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ॲनी ऑल्टमन यांनी अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन 12 वर्षांचे होते आणि त्यांची बहीण ॲनी 3 वर्षांची असताना सॅम ऑल्टमनने आपल्या बहिणीवर बलात्कार केला. 1997 पासून ते 2006 पर्यंत हा प्रकार सुरू होता, असा थेट आरोप ॲनी ऑल्टमनने केला आहे. या प्रकरणाची संबंधित माहिती सीएनबीसीच्या अहवालातून देण्यात आली आहे. ॲनी यांनी केलेल्या या आरोपांमुळे तंत्रज्ञान विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

सॅम ऑल्टमन आठवड्यातून अनेक वेळा आपल्या बहिणीवर अत्याचार करायचा. त्यामुळे ॲनीला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने तक्रारीवरून सॅम ऑल्टमनविरुद्ध खटला सुरू करावा आणि मला 75 हजार यूएस डॉलर्स नुकसानभरपाई द्यावी अशी ॲनीची इच्छा आहे.

दरम्यान, ॲनी ऑल्टमन यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सॅम ऑल्टमन यांनी देखील मौन सोडले आहे. सॅम यांनी आपली बाजू मांडत हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या बहिणीने केलेले गंभीर आरोप खोटे आहेत, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहेत.