घिबलीच्या वेडाने चॅटजीपीटीच्या कर्मचाऱ्यांची ‘झोप उडवली’

आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी ओपनएआयचा चॅटबॉट असलेल्या चॅटजीपीटीच्या घिबलीचा अल्पावधीत इतका बोलबाला झाला आहे की त्याने चॅटजीपीटीच्या कर्मचाऱ्यांची अक्षरश ‘झोप उडवली’ आहे. चॅटजीपीटीचे अत्यंत प्रगत असे ‘40 इमेज जनरेशन’ टुल सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत. परंतु, ते इतके लोकप्रिय झाले आहे की लोक वेडयासारखे या बॉटच्या माध्यमातून इमेज तयार करत आहेत. ओपन एआयचा सीईओ सॅम अल्टमन याने आता युजर्सना चक्क, काही काळ विश्रांती घ्या, असे आवाहन केले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनाही झोपेची गरज आहे, अशी मिश्किल टिपण्णी त्याने केली आहे. लोकांची गिबली इमेजची मागणी पूर्ण करण्याकरिता जॅट जिपीटीच्या टेक्निकल टीमला अहोरात्र सर्व्हरवर काम करावे लागत आहे. एकदोनदा सर्व्हरवर ताण येऊन बिघाडही झाला. परंतु, तो तात्काळ ठीक करण्यात आला. लोकांना लागलेल्या घिबली वेडापायी अल्टमनला सोशल मिडियाचा आधार घेत आता बस करा, असे सांगावे लागले. परंतु, युजर्स काही त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तुझ्या टीमला काम जमत नसेल तर त्यांना काढून टाका, इतपत सल्ला देण्याची मजल गेली आहे.