एलन मस्कच्या मालकीचे असेलेल्या X (ट्वीटर) वर आता लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. फक्त प्रीमियम सदस्यांना लाईव्ह लावण्याची सुविधा मिळणार असून सामान्य वापरकर्त्यांना या सुविधेचा आता लाभ घेता येणार नाही. हा बदल लवकरच लागू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
Instagram, Facebook आणि YouTube सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी प्रीमियम सदस्यत्वाची गरज भासत नाही. मात्र X वर आता लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी वापरकर्त्याकडे प्रीमियम सदस्यत्व असणे बंधनकारक असणार आहे. मात्र हे बदल कधी पासून लागू होणार हे अजून निश्चीत करण्यात आलेले नाही. X वर प्रीमियम सदस्यत्व 215 रुपयांपासून सुरू होऊन प्रीमियम + टीयर सदस्यत्वाची रक्कम 1,133 रुपयांपर्यंत आहे. मात्र आता नवीन बदलांमुळे प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या बदलांमुळे लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या वापरकर्त्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.