नीट फेरपरीक्षेत अवघे 61 टॉपर्स; 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी दिली होती फेरपरीक्षा

नीट परीक्षेतील गुणवाढीच्या घोटाळय़ानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या फेरपरीक्षेच्या आदेशानुसार झालेल्या परीक्षेत अवघे 61 टॉपर्स झाले आहेत. एकूण 1563 विद्यार्थ्यांना वाढीव गुण बहाल करण्यात आले होते. त्याबद्दल गहजब झाल्यावर त्यांचे गुण रद्द करून त्यांना फेरपरीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला होता. या विद्यार्थ्यांपैकी 813 जणांनी हे आव्हान स्वीकारले. याआधी या विद्यार्थ्यांपैकी 67 टॉपर ठरले होते, पण आता फक्त 61 टॉपर ठरले आहेत.

720 पैकी 720 गुण मिळालेल्या 6 पैकी 5 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेत हजेरी लावली. तथापि, यापैकी कोणालाही पुनर्परीक्षेत 720 गुण मिळालेले नाहीत.