30 टक्के परदेशी विद्यार्थ्यांनाच मिळणार ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रवेश

कॅनडा सरकारने परदेशी विद्यार्थी व्हिसाची संख्या मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे. आता केवळ 30 टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थीच कॅनडाचा सर्वात मोठा प्रदेश असलेल्या बीसी (ब्रिटिश कोलंबिया) मध्ये शिक्षण घेऊ शकतील. पूर्वी हे प्रमाण 35 टक्के होते, मात्र चालू वर्षात ते 5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. अनेक हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे बीसी मध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र कॅनडा च्या या निर्णयाचा फटका विद्यार्थ्याना बसण्याची शक्यता आहे. कॅनडामध्ये शिकणाऱयापरदेशी विद्यार्थ्यांमध्ये हिंदुस्थानी ची संख्या सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत कॅनडाचा हा निर्णय देशातील विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. येथील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पंजाबी समाजातील विद्यार्थ्यांची लांबच लांब रांग लागली आहे. यापूर्वी कॅनडाच्या सरकारने जाहीर केले होते की 1 सप्टेंबर 2024 पासून, खाजगी मालकीच्या संस्थांमध्ये शिकण्याची परवानगी असलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी यापुढे पदव्युत्तर वर्क परमिटसाठी पात्र राहणार नाहीत. सन 2022 मध्ये, कॅनडाने 8 लाखाहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांना तात्पुरता अभ्यास व्हिसा जारी केला होता. या काळात कॅनडातील संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱया परदेशी विद्यार्थ्यांपैकी 40 टक्के हिंदुस्थानी होते.