
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला गेल्यानंतर कफ परेड येथे राहणाऱ्या कुटुंबाला हेलिकॉप्टर राईड करायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करून एक मोबाईलवर संपर्क साधला. इथेच ते सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडले आणि त्यांना 60 लाखांचा चुना लागला. पण कफ परेड पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना बेड्या ठोकल्या.
कफ परेड परिसरात राहणाऱ्या कोठेकर या कुटुंबीयांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्याला जाणार होत्या. त्याकरिता त्यांनी गुगलवर शोध घेतला असता त्यांना ‘महाकुंभ हेलिकॉप्टर सर्व्हिस डॉट कॉम’ हे संकेतस्थळ दिसले. त्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने 60 हजार 600 रुपये होतील असे सांगत पैसे पाठविण्यासाठी क्यूआर कोड पाठवला. कोठेकर यांनी लगेच पैसे ऑनलाईन पाठवले, पण ती रक्कम सोनामुनी देवी नावाच्या महिलेच्या बँक खात्यात जमा झाल्याचे कोठेकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्या मोबाईलवर पह्न केल्यावर समोरच्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोठेकर यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुलाबा येथे राहणारा संकल्प जगदाळे (25) याचीदेखील अशीच फसवणूक झाली होती.
बिहारमधून तिघांना उचलले
पोलीस तपासात या गुन्ह्यातील पैसे बिहारमधील बिहार शरीफ शहरातील विविध एटीएम सेंटरमधून काढल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एका पथकाने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून अविनाशकुमार ऊर्फ बिट्टू, मुकेश कुमार, सौरभ कुमार अशा तिघांना अटक केली.