Mumbai crime news – ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी गजाआड

ऑनलाइन पोर्टलवर स्वस्त आयफोन विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला अंबोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. इम्रान अन्सारी, रिझवान अन्सारी आणि लक्ष्मण गोरे अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हा मालाड येथे राहतो. तो अंधेरी येथे खासगी कंपनीत काम करतो.

गेल्या वर्षी तो कार्यालयात काम करत होता. तेव्हा त्याला एका ऑनलाइन वेबसाईटवर आयफोन 14 प्रो हा 80 हजारांत असल्याची जाहिरात दिसली. स्वस्तात आयफोन मिळत असल्याने त्याने खरेदीसाठी होकार दिला. होकार दिल्यावर त्याला रिझवानने संपर्क साधला. त्यानुसार तो फोन 63 हजार रुपयांना देण्याचे ठरले. त्यावर विश्वास ठेवून 63 हजार रुपये पाठवले. काही दिवसांनी त्याने क्लोन केलेला बोगस आयफोन पाठवून फसवणूक केली. फसवणूक प्रकरणी त्याने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.