एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार 13 जुलै रोजी बँकेची ऑनलाईन सेवा 13 तास उपलब्ध राहणार नाही. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ई-मेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजेसद्वारे याची माहिती दिली. एचडीएफसी बँकेने सांगितलेय की, शनिवारी बँकेशी संबंधित सिस्टिम अपग्रेड करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात ही सेवा उपलब्ध होणार नाही. ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी त्यांच्या बँकिंग सेवांशी संबंधित कामे आधी किंवा नंतर पूर्ण करावी.
13 जुलै 2024 रोजी पहाटे 3 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत म्हणजेच ग्राहकांना जवळपास 13 तास बँक सेवा मिळणार नाही. ही गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही बँकेच्या सुट्टीच्या दुसऱया शनिवारी ही अपग्रेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे बँकेने म्हटले आहे. बँक खात्याशी संबंधित सेवा, जमा रक्कम पाहणे, फंड ट्रान्सफरशी संबंधित आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सेवा उपलब्ध होणार नाहीत. याशिवाय पासबुक डाऊनलोड, एक्स्टर्नल मर्चंट पेमेंट सर्व्हिसेस, यूपीआय पेमेंट या सेवांचा लाभ घेता येणार नाही.